हरिहर किल्ला
हरिहर किल्ला:- हरिहर किल्ला जुने नाव हर्षगड हा नाशिक शहरा पासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक जिल्हातील घोटी पासून 40 किलोमीटर अंतरावर, हा किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातील हा एक महत्वाचा किल्ला असून,गोंडा घाटातून जाणारा व्यापारी मार्ग पाहण्यासाठी बांधण्यात आला होता. त्याच्या विलक्षण दगडी पायऱ्यांमुळे त्याला अनेक अभ्यागत येतात. हरिहर किल्ला निसर्गाच्या कुशीत पाऊसाळ्यात छोटीसी सुट्टी घालवू पाहणाऱ्यांना साठी आणि ट्रेकिंग करणाऱ्या ट्रेकर्स साठी एक मोठे आकर्षण आहे हा किल्ला.तिथली हिरवळ चित्तथरारक दृश्य अप्रतिम परिसर ट्रेकर्स साठी आयुष्यातील ताणतणाव दूर करण्याचा एक डोस म्हणून काम करतात. हरिहर किल्ला हा महाराष्ट्रातील सर्वातकृष्ट ठिकाणांपैकी पैकी एक म्हणून ओळखल जाते. हरिहर किल्ल्याच्या शिखरावरून निसर्गाच्या लांबलचक डोंगररांगा मधील आश्चर्यकारक सौंदर्य पहायला मिळते. हरिहर किल्लावरून नाशिक जवळील अनेक किल्ले तुम्ही पाहू शकता. इतिहास:- हरिहर किल्ला त्रंबकेश्वर पर्वत रांगेत मध्ये येतो.हा किल्...